close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ऐन दिवाळीत वसईत अग्नीतांडव; ६०-७० गोदामांना आग

ही सर्व गोदामं प्लास्टिक आणि भंगारची होती

Updated: Nov 8, 2018, 09:15 AM IST
ऐन दिवाळीत वसईत अग्नीतांडव; ६०-७० गोदामांना आग

वसई : तर वसईच्या तुंगारेश्वर फाट्याजवळील ६० ते ७० गोदामांना रात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोदामं जळून खाक झालीत. ही सर्व गोदामं प्लास्टिक आणि भंगारची होती.

आगीत भंगारची वाहतूक करणारी वाहनं जळून भस्मसात झालीत. रात्री दीडच्या सुमारास ही आग लागली असून वसई-विरार अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.