मुंबई / पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई आणि पुण्यात अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्यात. यातील काही घटना गंभीर स्वरुपाच्या होत्या... आगीच्या वाढत्या घटनांमुळे अग्निशमन दलाची डोकेदुखी मात्र वाढलीय.
मुंबईत मालाडच्या दिंडोशी भागात फटाके फोडताना आग लागल्याची घटना घडली तर पुण्यात आगीच्या २२ घटना घडल्याचं समोर आलंय. यातील बहुतांश ठिकाणी आग फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्या. सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
दिवाळीच्या निमित्तानं मुंबईत अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. मालाडच्या दिंडोशी भागात फटाके फोडताना आग लागली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
तर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पुण्यात आगीच्या तब्बल २२ घटना घडल्यात. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.