मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. येथे आपल्याला वेगवेगळ्या कन्टेन्टचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे सायन्स, टेक, फूड, आर्ट, क्राफ्ट या सगळ्याशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात. जे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पोलिसाचा आहे. ज्यामध्ये एक पोलीस माकडाला पाण्याच्या बाटलीने पाणी पाजत आहेत.
पोलिसांना आपण नेहमीच कठोरपणे बोलताना किंवा लोकांवर रागवताना पाहिलं आहे. परंतु पोलिसाचा असा चेहरा फारच कमी लोकांनी पाहिला असेल. जो सर्वांसमोर आला आहे. पोलीस नेहमीच आपलं कर्तव्य बजावत असतात आणि आपल्या वर्दीशी एकनिष्ठ असतात. परंतु आज या पोलिसाने माणूसकीचं कर्तव्य देखील बजावलं आहे. ज्यामुळे त्याचा दयाळूपणा आणि प्राणीमात्रांवरील प्रेम समोर आलं आहे.
उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे तळपत्या उन्हात सर्वांनाच पाण्याची खूप जास्त गरज असते आणि या माकडासोबत देखील असंच घडलं असावं. कुठे ही पाणी न मिळाल्यामुळे आणि उन्हामुळे या माकडाला खूपच तहान लागली होती आणि तहानलेल्या माकडाला या पोलिसाने आपल्याकडील पाणी पाजलं आणि त्याची तहान भागवली आहे.
या व्हिडीओमध्ये या माकडाला पाणी पिताना पाहून तुमच्या लक्षात येईलंच की, या माकडाला किती तहान लागली असावी आणि त्याची तहान या पोलिसाने भागवली. हे सगळं दृश्य जवळील काही लोकांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहे. जो आत सर्वांसमोर व्हायरल झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील माळशेज घाटावर तैनात असलेले वाहतूक पोलीस जवळपासच्या जंगलातून येणाऱ्या प्राण्यांना पाणी देण्यासाठी अनेक बाटल्या घेऊन जाताना दिसले.
StreetDogsofBombay नावाच्या इंस्टाग्राम पेजने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "शेवटपर्यंत पहा - निष्पाप प्राण्याबद्दल त्यांच्या दयाळूपणा आणि करुणेसाठी महाराष्ट्र पोलिसांना सलाम. उन्हाळा वाढत आहे, ज्यामुळे हे प्राणी पाणीच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहेत, म्हणून कृपया आपल्या घराबाहेर पाण्याचे भांडे ठेवा आणि उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करा."
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, जो आपल्याला सगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. पोलिसांचा हा दयाळूपणा आणि करुणा पाहून लोक प्रभावित झाले आहे.