Weather Updates : देशभरातील किमान तापमानात घट झाली असली तरी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. वायव्य भारताला वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. दिल्लीत काल रात्री सुरू झालेला पाऊस अजूनही अनेक भागात रिमझिम स्वरूपात सुरु असल्याच चित्र आहे. उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस झाल्याच पाहिला मिळालं. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर आज उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातही काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाजाची शक्यता आहे. (Weather Updates Rain forecast in this state including Maharashtra see the weather conditions in the state cold wave latest update in marathi)
मिळालेल्या ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची भीती विभागाने दर्शविली आहे. पावसानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. वायव्य भारतात नव्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाल्यामुळे देशाच्या हवामान काहीसा बदल दिसून येणार आहे.
उत्तर भारतावर जोरदार थंड हवा असून वाऱ्याची चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थानवर दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहणार आहे, असं हवामान विभागाने सांगितल आहे. किमान तापमानात घट होणार असल्याचही विभागाने सांगितल आहे. उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होण्याचा अंदाज असून पुणे आणि परिसरात हवामान कोरडे असेल अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे. पुण्यात किंचित किमान तापमानात वाढ दिसून आली आहे. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परिक्षेत्रात ह्या तीन दिवसात काहीसे वातावरण ढगाळ असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रदेशांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी शक्यता वर्तविण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थानमध्ये तसंच उत्तर मध्य प्रदेशात गारपीट अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर अर्थात पिंक सिटीचे हवामान गुलाबी असल्याने सर्वसामान्य गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहेत.