पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगाब्लॉक, 'या' ट्रेन रद्द

Mumbai Local Mega Block: गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 19, 2023, 11:18 AM IST
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगाब्लॉक, 'या' ट्रेन रद्द title=
western railway mega block on monday watch local trains time

Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येतेय. गोखल पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर आज म्हणजेच 19 आणि 20 डिसेंबर रोजी तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मध्यरात्री 1.40 ते पहाटे 4.40 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अप-डाऊन हार्बर लाइन, धीमी आणि फास्ट मार्गासह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेजर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्या आहेत. तर, तीन लोकल त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशीराने धावतील.

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी हा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या पुलाचे काम सुरू आहे. आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुलाचे गर्डर टाकण्यात येत आहेत. या पुलाच्या बांधकामासाठी  पालिकेने रेल्वेला पत्र लहित मेगाब्लॉक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, मागील आठवड्यातही रेल्वेने ब्लॉक आयोजित केला होता. तर, आताही दोन दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. 

या ट्रेन रद्द होणार 

- विरारहून 10.18 वाजता सुटणारी 92192 विरार-अंधेरी लोकल
- अंधेरीहून 4.25 वाजता सुटणारी अंधेरी-विरार लोकल
- वांद्रेयेथून 405 वाजता सुटणारी वांद्रे-बोरीवली लोकल
- बोरीवलीहून 4.53 वाजता सुटणारी बोरीवली-चर्चगेट लोकल
- वसई रोडहून 11.15 वाजता सुटणारी वसई रोड-अंधेरी लोकल
- अंधेरीहून 4.04 वाजता सुटणारी अंधेरी-विरार लोकल
- अंधेरीहून 4.05 वाजता सुटणारी अंधेरी-चर्चगेट लोकल
-चर्चगेटहून 00.31 वाजता सुटणारी चर्चगेट-विलेपार्ले लोकल 

विलंबाने धावणाऱ्या लोकल

विरारहून 03.25 वाजता सुटणारी विरार-चर्चगेट लोकल 15 मिनिटे उशीराने धावणार आहे. बोरीवलीहून 04.05 वाजता सुटणारी बोरीवली-चर्चेगेट लोकल 15 मिनिटे उशीरा सुटणार. तर, विरारहून 3.35 वाजता सुटणारी विरार-बोरीवली लोकल 10 मिनिटे विलंबाने सुटणार आहे.