'वन नेशन, वन इलेक्शनच्या घोषणेचं काय? विधानसभा निवडणुकीला वेळ, आरोपांचा खेळ

केंद्रीय निवडणुक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या... मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या नाहीत... यावरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये राजकारण रंगलंय. 

वनिता कांबळे | Updated: Aug 17, 2024, 09:54 PM IST
'वन नेशन, वन इलेक्शनच्या घोषणेचं काय? विधानसभा निवडणुकीला वेळ, आरोपांचा खेळ title=

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापायला सुरूवात झालीय... शुक्रवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची अपेक्षा होती.. मात्र ती झालीच नाही... केवळ जम्मू-काश्मीर आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली... त्यामुळे राज्यातील विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय..पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करतात. मात्र 4 राज्यांत विधानसभा निवडणुका एकत्र होत नाहीत हा विरोधाभास असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय... तर पराभवाला घाबरल्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्याची टीका संजय राऊतां केली आहे.

मला मुख्यमंत्री करा असं उद्धव ठाकरे कधीच म्हणाले नव्हते...सर्वानुमते त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं...असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय...महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचंही राऊत नागपुरात म्हणाले... 

सेनापतीच जर गळपटलाय तर सैन्याचं काय? असा प्रश्न सोबत गेलेल्या अनेकांना पडला असेल असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

'सत्ताधारी पराभवाला घाबरलेत'

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या आधीच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी देखील बोलून दाखवली होती... महाराष्ट्रात अन्य राज्यांसोबत निवडणुका का घेतल्या नाहीत, याचं कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. गेल्यावेळी ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी मात्र विधानसभा निवडणूक लांबणीवर पडलीय... आता दिवाळीनंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे... मात्र आतापासूनच आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटायला सुरूवात झालीय..