पुण्यातील पूर परिस्थितीसाठी जबाबदार कोण? नदीकाठ सुधार प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

पुण्यातील पूर परिस्थितीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पुण्यातील बहुचर्चित नदी सुधार प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट...

वनिता कांबळे | Updated: Jul 27, 2024, 11:43 PM IST
पुण्यातील पूर परिस्थितीसाठी जबाबदार कोण?  नदीकाठ सुधार प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात title=

Pune Flood  : पुणे शहराच्या मधोमध वाहणाऱ्या मुठा नदीचा कायापालट करण्याचा घाट महापालिकेने घातलाय.. येरवड्यापासून डेक्कनपर्यंत नदीचं रुपडं पालटण्यात येणाराय. गटार बनलेली नदी स्वच्छ आणि सुंदर करण्याचा देखील प्रयत्न आहे.. गुजरातमधील साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या धर्तीवर मुठा नदीचा विकास होणार आहे. हजारो कोटी रुपयांचा खर्च असलेलं हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र आता त्यावरून प्रश्न विचारले जातायत

महापालिकेत तसेच राज्यात सत्ता असलेल्या तत्कालीन महायुती सरकारनं हा प्रकल्प  पुणेकरांवर लादल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याचा प्रत्यारोप कोथरूडचे आमदार तसेच वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. 

25 जुलैला पुण्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीला हा नदी सुधार प्रकल्प कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो. तर कोथरूडचे आमदार आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी हा आरोप फेटाळून लावलाय...
पुण्यातील पर्यावरण प्रेमींचा या प्रकल्पाला आधीपासूनच विरोध आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देखील हा प्रकल्प पर्यावरणाला मारक असल्याची टीका केली होती. आगामी काळात या प्रकल्पावरून पुण्यात आरोप-प्रत्यारोपांचा पूर येणार एवढं मात्र नक्की...

पुण्यातील पर्यावरण प्रेमींचा या प्रकल्पाला आधीपासूनच विरोध आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देखील हा प्रकल्प पर्यावरणाला मारक असल्याची टीका केली होती. आगामी काळात या प्रकल्पावरून पुण्यात आरोप-प्रत्यारोपांचा पूर येणार एवढं मात्र नक्की...

पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीये...त्यामुळे सध्या धरणातून 6030 क्युसेक्सने, भीमा नदीत विसर्ग सुरू आहे...दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...