पुणे : फेसबुकने पुण्यातील महिलांना एकत्र आणलं आहे. महिला उदयोजकांचा गट तयार झाला आहे. नीलम क्षीरसागर आणि अभिलाषा बेलोरे यांनी जवळपास शंभर महिला उदयोजकांना एकत्र करत कनेक्टिंग बिझनेस सुरु केला आहे. याची पहिली काँन्फरन्स पुण्यात पार पडली.
या बिझनेसच्या माध्यमातुन पर्यटनापासून ते खादयपदार्थ बनविणा-या महिला आता एकमेकांना व्यवसाय देणार आहेत. यातून महिला सक्षमीकरण तर होईलच याशिवाय महिलांनी तयार केलेल्या वस्तुला चांगले मार्केट आणि पैसा ही मिळणार असल्याने या उपक्रमाचे महिलांनी कौतुक केल आहे.
महिला उद्योजकांना एकत्र करुन त्यांना रेफरन्स बिझनेस होण्यासाठी हा गट तयार करण्यात आला आहे. एकमेकींच्या मदतीने अतिशय चांगल्या प्रकारे बिझनेस केला जाऊ शकतो, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.