आलिशान कारची नोंदणी न करणं पडलं महागात

जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं महागड्या तसंच आलिशान कारची विनानोंदणी रपेट गाडीच्या मालकाला चांगलीच भोवलीय. चोपडा इथल्या रस्त्यावर बी. सी. अवंती या सुमारे 47 लाखांच्या स्पोर्ट्स कारची विनानोंदणी रपेट सुरु होती. 

Updated: Oct 10, 2017, 10:07 PM IST
आलिशान कारची नोंदणी न करणं पडलं महागात title=

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं महागड्या तसंच आलिशान कारची विनानोंदणी रपेट गाडीच्या मालकाला चांगलीच भोवलीय. चोपडा इथल्या रस्त्यावर बी. सी. अवंती या सुमारे 47 लाखांच्या स्पोर्ट्स कारची विनानोंदणी रपेट सुरु होती. 

या कारला जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकातील अधिका-यांनी जप्त करून अज्ञातस्थळी ठेवलं. चोपडा इथल्या एका जमीन विकासकाची ही कार असून पाच हजार रुपये दंड आणि 5 लाख 95 हजारांचा व्याजासह कर वसूल करून या कारची अधिकृत नोंदणी करण्यात आलीय. कारवाईनंतर आता ही कार मालकाला परत करण्यात आलीय.