पुणे : पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम अपेक्षापेक्षा अधिक वेगानं सुरु असल्याचा दावा महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केलाय. पुणे मेट्रोचं काम रखडणार असल्याच्या बातम्यांचं त्यांनी खंडन केलय.
मेट्रो प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे, त्याचप्रमाणे भूसंपादनही सुरु आहे. त्यामुळे प्रकल्प रखडण्याचं काहीच कारण नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पुणे मेट्रो ही जगातील अव्वल दर्जाची मेट्रो असेल. सुरवातीच्या टप्प्यात शहरातील ५० टक्के प्रवासी मेट्रोनं प्रवास करतील. त्यानंतर गरजेनुसार मेट्रोचं जाळं विस्तारणार असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली.