Pune News : राज्याची चिंता वाढवणारी बातमी. पुण्यात H3N2 या विषाणूमुळे बाधा झालेले 22 रुग्ण आढळले आहेत. (H3N2 Virus in Pune) जानेवारी ते मार्च या दरम्यान या सर्वांना बाधा झाली आहे. (H3N2 Virus Maharashtra On High Alert) सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत. (Maharashtra News) याबाबत एनआयव्हीने तसा अहवाल दिला आहे. या अहवालावरुन पुण्यात या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची लक्षण ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. देशभरात H3N2ची साथ पसरली आहे. पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. H3N2 संदर्भात आता खासगी रूग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ( Maharashtra News in Marathi)
दरम्यान, देशातही चिंता व्यक्त होत आहे. नव्या व्हायससंदर्भातली. H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात तिसरा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये 58 वर्षांच्या महिलेचा सयाजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान अधिक तपासणीसाठी नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणू देशात वेगाने पसरतोय. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच काळजी घ्या असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
H3N2 व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने H3N2 व्हायरस संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. राज्यांचा सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीत आरोग्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातही याचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
या व्हायरसा धोका आणि वाढता फैलाव लक्षात घेता सर्वच आरोग्य यंत्रणांना या व्हायरस वर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. विशेषत: ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्हासरसचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घ्यावी. या संदर्भात खबरदारी घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. अद्यापि कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.