शेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला... धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जमिनीचा वाद मिटवायला गेलेल्या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.

Updated: Apr 17, 2023, 09:57 AM IST
शेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला... धारदार शस्त्राने तरुणाची हत्या title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : शेतीच्या वादातून (agricultural land dispute) तरुणाचा खून (Yavatmal crime) झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (Yavatmal News) घडली आहे. या हत्येननंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. शेतीच्या जुन्या वादातून  एका तरुणाची चाकू पोटात खुपसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी (Yavatmal Police) याप्रकरणी कुंडलिक राठोड नावाच्या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

यवतमाळ मध्ये शेतीच्या जुन्या वादातून एका तरुणाची पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दराटी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमडापूर येथील बसस्थानक परिसरात हा थरार घडला आहे. प्रकाश राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कुंडलिक राठोड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मृत प्रकाश 5 ते 6 जणासोबत शेतीचा ताबा सोडून देण्याचे सांगण्यासाठी कुंडलिकच्या दुकानात गेले होते. त्याचवेळी कुंडलिकने चर्चेनंतर प्रकाशच्या पोटात चाकू खुपसला. यानंतर प्रकाश राठोडला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

दुपारी 12.30 च्या सुमारास अमडापूर येथील बसथांब्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. गेल्या काही वर्षांपासून अमडापूर परिसरातील शेतीवरुन प्रकाश आणि कुंडलिक यांच्यात वाद सुरू होता. ज्या शेतीवरुन हा वाद सुरु होता ती कुंडलिकच्या ताब्यात होती. रविवारी दुपारी प्रकाश राठोड हा पाच ते सहा जणांसोबत शेतीचा ताबा सोडून दे असे सांगण्यासाठी कुंडलिकडे गेले होते. त्यावेळी सुरुवातीला दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर प्रकाश आणि त्याच्यासोबत आलेल्यांचा कुंडलिकसोबत वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. तितक्यात कुंडलिंकने खिशातून चाकू काढत थेट प्रकाशच्या पोटात खुपसण्यास सुरुवात केली.  वार झाल्यानंतर प्रकाशने तिथून पळ काढला. मात्र कुंडलिकने त्याच्या मागे धाव घेतली आणि पुन्हा हल्ला केला.

या सर्व प्रकार पाहून तिथे असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वांनी कुंडलिकला थांबवण्यासाठी त्याच्या मागे धाव घेतली. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. जखमी प्रकाशला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावच्या पोलीस पाटलांनी या धक्कादायक घटनेची माहिती दराटी पोलिसांना दिली. यानंतर दराटी पोलिसांनी कुंडलिकला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.