यवतमाळ : यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणादरम्यान घाटंजी तालुक्याच्या कापसी गावातील १२ बालकांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझरचे डोस दिल्याचा खळबळनजक प्रकार घडला होता. या प्रकरणी आणखी दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर अखेर निलंबन केलं.
डॉ. महेश मनवर आणि डॉ. भूषण मसराम अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि समूदाय वैद्यकीय अधिका-यांवर याआधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
दुसऱ्या समितीने केलेल्या चौकशीत आरोग्य केंद्रावरील आणखी दोन वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्याने त्यांचं निलंबन केलं.