योगेश खरे, नाशिक : नाशिकमधील स्टॅम्प पेपर घोटाळा झी24तासने उघडकीस आणला होता. त्यानंतर आता आरोपींवर कारवाई सुरु झाली आहे. नाशिक शहरात स्टॅम्प घोटाळा करून जमीन बळकावणाऱ्या भू-माफियांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
सचिन मंडलिक याने नाशिक तहसीलदार कार्यालयात फेरर्फार करून जमीन मुक्ता मोटकरीच्या नावावर केली होती. स्वाभिमान संघटनेचा पदाधिकरी आणि राणे समर्थक रम्मी राजपूत, सचिन मंडलिकसह 20 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.
आंनदवल्ली परिसरात ही कोट्यवधींची जमीन ताब्यात घेण्याप्रकरणी रमेश मंडलिक यांची हत्या झाली होती. रमेश मंडलिक हत्याप्रकरणी तपासात हे एक पाऊल पुढे पडलं आहे. राज्यात पहिल्यांदाच मोक्का अंतर्गत स्टॅम्प घोटाळा भूमाफियांवर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकमधील हा स्टॅम्प पेपर घोटाळा झी 24 तासने समोर आणला होता. या घोटाळ्यात अनेकांचा हात आहे. घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.