धनंजय मुंडे आणि पंकजा एकाच व्यासपीठावर, लोकांनी वाजवल्या टाळ्या

परळीत रविवारी हा योग आला. 

Updated: Sep 2, 2018, 07:42 PM IST
धनंजय मुंडे आणि पंकजा एकाच व्यासपीठावर, लोकांनी वाजवल्या टाळ्या

बीड: विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील दुरावा सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे भाऊ-बहीण एकत्र दिसल्यास अनेकांच्या भुवया साहजिकच उंचावल्या जातात. परळीत रविवारी हा योग आला. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या 82 व्या तपोनुष्ठान सोहळ्यात धनंजय आणि पंकजा एकाच व्यासपीठावर हजर होते. 

व्यासपीठावर माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री बदमराव पंडित आदी मंडळीदेखील उपस्थित होती. व्यासपीठावर या दोघांचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. दोघांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.