मुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा, काकासाहेब शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी

मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय.

Updated: Jul 23, 2018, 07:02 PM IST
मुख्यमंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा, काकासाहेब शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी title=

औरंगाबाद: गंगाखेड तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या मोर्चेकरी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर हा वणवा राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. गोदावरीत उडी मारल्यानं मृत्यू पडलेल्या काकासाहेब शिंदेंचा मृतदेह स्वीकारण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, आरक्षणाची तात्काळ घोषणा, शिंदेच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत. 

या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय. 

गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोक्यावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात उडी मारली. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड केली. तसेच आंदोलकांनी पुणे-औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक अडवून धरली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.