'कुठल्या परिबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे?' राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेची भाजपकडून खिल्ली

 'हे सरकार लोकशाही पद्धतीने चालत नसून ठोकशाही पद्धतीने चालत आहे. अधिवेशन आलं की कोरोना येतो पुन्हा जातो कुठे?'असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला

Updated: Jun 26, 2021, 07:15 PM IST
'कुठल्या परिबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे?' राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेची भाजपकडून खिल्ली title=

विष्णू बुरगे, बीड : 'हे सरकार लोकशाही पद्धतीने चालत नसून ठोकशाही पद्धतीने चालत आहे. अधिवेशन आलं की कोरोना येतो पुन्हा जातो कुठे?'असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेवरही धस यांनी जोरदार टीका केली. 'कुठल्या परीबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे?'. अशा खरमरीत शब्दात राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेची खिल्ली उडवली. कोरोनाचे नियम सर्वांसाठीच आहेत तर मग सत्ताधाऱ्यांसाठी नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाकडून परिसंवाद काढण्यात येत आहे. ही परिसंवाद यात्रा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा कारण दाखवत सरकार मुख्य मुद्दा पासून पळ काढत आहे. तर दुसरीकडे कोरोना हा सर्वसामान्यांसाठी आणि विरोधकांसाठीच आहे. सत्ताधाऱ्यांसाठी नाही का? असा सवालही धस यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेची खिल्ली उडवताना त्यांनी म्हटले की, 'कुठल्या परीबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे.? कोरोनाचे नियम सर्वांसाठीच आहेत तर मग सत्ताधाऱ्यांसाठी नाहीत का? असा सवाल त्यांनी परिसंवाद यात्रेमुळे विचारला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा मराठवाड्यात सध्या दौरा सुरू आहे. त्यावर ते बोलत होते.