ठाणे: राज्यातलं पहिलं सार्वजनिक इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारण्याचा निर्णय ठाणे महानगर पालिकेने घेतला आहे. या मशिनच्या माध्यमातून बॅटरीवर चालणारी वाहनं चार्ज करता येणार आहेत. मुंबईपाठोपाठ ठाण्यासारख्या शहरात सध्या प्रदूषणाची समस्या ऐरणीवर आलीये. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर ठाणेकरांकडून जास्तीत जास्त करता यावा तसंच जेव्हा चार्जिंगची गरज भासेल त्यावेळी जवळच्याच चार्जिंग सेंटरवर जाऊन ती गाडी चार्ज करता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेने हे चार्जिंग सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या आवारात प्रायोगिक तत्वावर यातलं पहिलं चार्जिंग सेंटर उभारण्यात आलंय. त्यानंतर टप्पाटप्प्याने ठाण्यातल्या विविध भागात शंभर ठिकाणी ही चार्जिंग सेंटर्स नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जातील. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पेक्षा या चार्जिंग सेंटर वरती कमी पैशात गाडी चार्ज करता येणार आहे.
या मशिनच्या माध्यमातून एखादी इलेक्ट्रिक टू व्हीलर किंवा थ्री व्हिलर सहज या चार्जिंग पॉइंट्सवर चार्ज करता येईल. मुंबईपाठोपाठ ठाण्यासारख्या शहरात सध्या प्रदूषणाची समस्या ऐरणीवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर ठाणेकरांकडून जास्तीत जास्त करता यावा. तसेच जेव्हा चार्जिंगची गरज भासेल त्यावेळी जवळच्याच चार्जिंग सेंटरवर जाऊन ती गाडी चार्ज करता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेने हे चार्जिंग सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महानगरपालिकेच्या आवारात हे चार्जिंग सेंटर प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आले आहे . त्यानंतर टप्पाटप्प्याने ठाण्यातल्या विविध भागात शंभर ठिकाणी ही चार्जिंग सेंटर्स नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जातील. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पेक्षा या चार्जिंग सेंटर वरती कमी पैशात गाडी चार्ज करता येणार आहे.