धारावीत कोरोनाचे १० रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या १८९९ वर

हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढले.

Updated: Jun 6, 2020, 06:27 PM IST
धारावीत कोरोनाचे १० रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या १८९९ वर  title=

मुंबई : कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावी भागात आज कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या १८९९ वर पोहोचली आहे.  या भागात आतापर्यंत ७१ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

धारावी येथे बुधवारी १९ आणि गुरुवारी २३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी धारावी येथे १७ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे एकूण १४४२ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी मुंबईत किमान ४८ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत सध्या रूग्णांची संख्या ४४ हजारांच्या वर गेली आहे. धारावी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत होती. पण गेल्या काही दिवसांपासून येथे परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे डोर-टू-डोर स्क्रिनिंग केले गेले. शिबिरे उभारली गेली, पोलिसांनी कठोर नियम लागू केले, चाचणीची संख्या वाढविली गेली. त्यानंतर येथे कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले.