मोठी बातमी । राज्यात या महिन्यापासून 100 टक्के अनलॉक

 Unlock Maharashtra : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग कमी झाला आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 19, 2022, 09:42 AM IST
मोठी बातमी । राज्यात या महिन्यापासून 100 टक्के अनलॉक title=
संग्रहित छाया

मुंबई : Unlock Maharashtra : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग कमी झाला आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट आटोक्यात (Corona Third Wave ) आल्यानंतरही दररोज शेकडो रूग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सनं सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मास्क मुक्तीचा निर्णयही मार्चनंतरच होणार आहे. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवीन व्हेरियंट आढळला आहे. यामुळे अजून थोडावेळ अनलॉक करण्यासाठी घेतला जाणार आहे. (100 per cent unlock since March in Maharashtra , task force cautious decision)

कोरोना निर्बंधात (Corona restrictions) शिथिलता आणण्याच्या सूचना राज्यांना केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यानुसार  हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, लवकरच  कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्राकडून (Central Government) राज्यांना निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना केल्या आहेत.(Corona Restrictions in India)

जवळपास गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने (Coronavirus) देशातील नागरिकांना हैराण केले आहे. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. राज्य कोरोनावरील कडक निर्बंधाबाबत (Corona Restrictions in India) पुर्नविचार करु शकता आणि अनावश्यक निर्बंध दूर करुन दिलासा देऊ शकतात, याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे. त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मात्र टास्क फोर्सने सावध पवित्रा घेताना सध्या काही प्रमाणात रुग्णवाढ होत असल्याने मार्च 2022 नंतर अनलॉक होणार आहे.