मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार १३५ झाली आहे. कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर बळींची संख्या ७२ झाली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत पाच मृत्यूमुखी पडलेत. तर पुण्यात १० जणांचा बळी गेला आहे. तर कल्याण डोंबिवलीतली एकाचा समावेश आहे.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1135 झाली आहे. कोरोनाबाधित 117 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 942 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 8, 2020
महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये गुणाकाराच्या पद्धतीनं वाढ झालेली नाही. राज्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय. महाराष्ट्रातला कोरोनाचा मृत्यूदर जास्त असला तरी कोरोनाचे रुग्णही बरे होतायत. आतापर्यंत ११७ रुग्ण बरे झालेत. राज्यात तालुकास्तरावर रक्षक क्लिनिक सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी तीन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवूया,मी गर्दी करणार नाही,मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही,मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार..मी कोरोनाला हरवणार..! आपण सर्व कोरोना विरुद्धची लढाई जिंकू या..!#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक pic.twitter.com/ECfP7fxlTo
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 7, 2020