धारावीत कोरोनाचे २५, तर दादरमध्ये २१ रूग्ण वाढले

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली

Updated: May 8, 2020, 07:56 PM IST
धारावीत कोरोनाचे २५, तर दादरमध्ये २१ रूग्ण वाढले title=

मुंबई : धारावीत कोरोनामुळं आज ५ जणांचा मृत्यू झाला असून आणखी २५ रूग्ण वाढले आहेत. धारावीत एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता ८०८ झाली आहे. तर यातील २२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दादरमध्ये कोरोनामुळं एकाचा मृत्यू झाला असून २१ नवे रूग्ण वाढले आहेत. दादरमधील एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता ८७ असून यातील १७ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. दादरमध्ये कोरोनामुळं एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

माहिममध्ये कोरोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. माहिममध्ये आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या १०७ असून त्यातील २३ जण बरे झाले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्याचे आढळून आले. 

आरोग्य सेवा सुधारण्यात अपयश दिसले. महापालिका रुग्णालयांमधील गैरसोयींबद्ल अनेक तक्रारी समोर आल्या. यासाठी आयुक्तांना जबाबदार धरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.