४० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार

विविध मागण्या घेऊश सुमारे ४० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यासाठी मार्गावरून कूच करत आहे. नाशिकमधून पायी निगालेला हा मोर्चा मुंबई शहरानजिकच्या भिवंडी तालुक्यातील कांदली जवळील वलकस फाट्यानजीक पोहोचला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 10, 2018, 08:01 AM IST
४० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार title=

मुंबई : विविध मागण्या घेऊश सुमारे ४० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यासाठी मार्गावरून कूच करत आहे. नाशिकमधून पायी निगालेला हा मोर्चा मुंबई शहरानजिकच्या भिवंडी तालुक्यातील कांदली जवळील वलकस फाट्यानजीक पोहोचला आहे.

तळपत्या उन्हातही एक पाऊल पुढे

सुमारे ४० हजारांहून अधिक शेतकरी या भव्य मोर्चात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी रात्री विश्रांती घेतल्यावर हा मोर्चा शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेने रवाणा होईल. गुरूवारी रात्री शाहपुरच्या भातसा डॅमजवळ विश्रांती घेतल्यावर तळपत्या उन्हातूनही मोर्चेकरी आपल्या निश्चयी मनाने एकेक पाऊल पुढे सरकत होते. संपूर्ण कर्जमाफी करावी, विनाधिकार अधिनियम लागू करावेत. तसेच, शेतीमालाला हमीभाव मिळावा यांसारख्या अनेक मागण्या घेऊन हे शेतकरी राजधानी मुंबईच्या दिशेनेने निघाले आहेत. ज्यांना आशा आहे राजधानी मुंबईतील मंत्रालयात बसणाऱ्या सरकाकडून आपल्या आपेक्षा पूर्ण होतील.

शेतकऱ्यांनी केले स्वागत

नाशिकहून निघालेला हा शेतकरी मोर्चा भिवंडी तालुक्यात प्रवेशकर्ता होताच भिवंडी तालुक्यातील असंख्य शेतकरी आणि राजकीय पक्षांनी मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले.