Mumbai Pune Expressway : बोरघाटात भीषण अपघातात 5 जण जागीच ठार; जमखींवर उपचार सुरु

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारीसुद्धा 5 जणांना अपघातातच जीव गमवावा लागलाय

Updated: Nov 18, 2022, 08:21 AM IST
Mumbai Pune Expressway : बोरघाटात भीषण अपघातात 5 जण जागीच ठार; जमखींवर उपचार सुरु title=

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातांचे सत्र सुरुच आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात (Accident) रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अनेकांचा अद्यापही बळी जात आहे. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जणांना जीव गमवाला लागलाय. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर मध्यरात्रीच्या सुमारास एर्टिगा कारला झालेल्या अपघातात 5 प्रवासी जागीच ठार झाले. तर 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात (MGM) उपचारासाठी हलवण्यात आले आहे. खोपोलीजवळ (khopoli) बोरघाटात मुंबई लेनवर हा अपघात झाला. मुंबईकडे (Mumbai) जाणारी एर्टीगा कार पुढच्या वाहनावर जोरदार आदळल्याने हा अपघात झालाय. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. देवदूत, आय आर बी, बोरघाट पोलीस व इतर यंत्रणांनी अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी 24 तास वाहनांची तपासणी करण्यासाचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सोमवारी दिले होते. परिवहन आयुक्त भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात कशामुळे होतायत?

मुंबईकडे येणाच्या वाहनांचे घाट उतरताना  ब्रेक निकामी होऊन हे अपघात होत असल्याचे समोर आले आहे. लेन सोडून वेगात वाहने पुढे जातात. एक्स्प्रेस वेवर काही वेळा वाहनेही बंद पडतात. त्यामुळे पाठीमागून वेगाने येणारे वाहने थांबलेल्या वाहनांवर आदळतात आणि भीषण अपघाताला बळी पडतात.