Corona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

राज्यात  कोरोनाचा (Corona New Varient) नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत. 

Updated: Oct 14, 2022, 11:35 PM IST
 Corona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : कोरोनामुळे (Corona) गेली 2-3 वर्ष अतिशय वाईट गेली. देशाची आर्थिक घडी विस्कटली. अनेकांचा रोजगार गेला. काहींचा कोरोनामुळे जीव गेला. काहींनी आपल्या घरातील व्यक्ती गमावली. या जीवघेण्या व्हायरसमुळे कोरोना पुन्हा नको, असं प्रत्येक जण म्हणून लागला. कोरोना निर्बंधांमुळे (Corona Restrictions) अनेकांचा जीव मेटाकुटीस आला होता. मात्र जसाजसा कोरोनाचा जोर संपत गेला तसं तसं टप्प्याटप्याने निर्बंध शिथील करण्यात आले. राज्यात या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मास्कमुक्ती करण्यात आली. (5 patients of new variant of corona xbb were found in maharashtra)

सर्व काही सुरळीत सुरु असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात  कोरोनाचा नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत. गुरूवारी या नव्या व्हेरियंटचे 5 रूग्ण आढळले आहेत. याआधी या XBB व्हेरियंटच्या 71 केसेस देशात विविध राज्यात आढळल्या आहेत. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू या राज्यात या व्हेरियंटचे रूग्ण आढळले आहेत. या नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालं आहे.