'या' देशांमध्ये अजूनही ५०० आणि १००० च्या नोटांचा मोठा साठा

रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या सुरु असलेल्या वादावर भाष्य

Updated: Nov 14, 2018, 10:08 PM IST
'या' देशांमध्ये अजूनही ५०० आणि १००० च्या नोटांचा मोठा साठा title=

कोल्हापूर: नोटाबंदीमुळे रद्द करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा मोठा साठा नेपाळ आणि भूतानाच्या बँकेत पडून असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते बुधवारी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. १९ नोव्हेंबरला होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकीय़ मंडळाच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा सरकारकडून संकोच होत असल्याबद्दल काही वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती. 

अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून एकमेकांवर जाहीर आरोपही करण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेतील तणाव फारच वाढला होता. 

या वादाच्या पार्श्वभूमीवर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेटही घेतली होती.