मुंबईत रात्रभरात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या ६१३ वाहनचालकांवर कारवाई

नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजेच मद्य पिऊन गाडी चालवणा-या ६१३ वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केलीये. 

Updated: Jan 1, 2018, 11:26 AM IST
मुंबईत रात्रभरात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या ६१३ वाहनचालकांवर कारवाई title=

मुंबई : नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजेच मद्य पिऊन गाडी चालवणा-या ६१३ वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केलीये. हीच आकडेवारी केल्या वर्षी म्हणजे ३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री ५६५ इतकी होती. 

याचाच अर्थ नवीन वर्षाच्या स्वागतावेळी ३१ डिसेंबर २०१७ या रात्री तब्बल ४८ जास्त तळीराम आढळून आलेत. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मुंबई ट्रफिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हसोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आलीये. 

हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याप्रकारणी १९९ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. तसंच बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली. तसंच नो पार्किंगमध्ये गाडी लावणा-या ६२० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलीये. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते १ जानेवारीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. यात एकूण ४ हजारपेक्षा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच जवळपास ४ लाख रुपये दंडही वसूल करण्यात आलाय.