महाराष्ट्रात कोरोनाचे ६७४१ रुग्ण वाढले, तर ४५०० जणांना डिस्चार्ज

राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 67 हजार 665 इतका झाला आहे. 

Updated: Jul 14, 2020, 08:10 PM IST
 महाराष्ट्रात कोरोनाचे ६७४१ रुग्ण वाढले, तर ४५०० जणांना डिस्चार्ज
संग्रहित फोटो

मुंबई : आज दिवसभरात राज्यात 6741 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 213 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 10,695 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 67 हजार 665 इतका झाला आहे. 

आज दिवसभरात राज्यात 4500 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 49 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सध्या राज्यात 1 लाख 7 हजार 665 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.67 टक्के इतकं झालं आहे. तर राज्यातील मृत्यूदर 4 टक्के इतका आहे. 

राज्यात 6,98,854 लोक होम क्वारंटाईन असून 42,350 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.