मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळ लष्करामार्फत उभारण्यात येणा-या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाची लांबी 240 फूट तर रुंदी 12 फूट इतकी आहे.
लष्कराचा रणगाडा वगळता इतर कितीही वजन पेलण्याची क्षमता या पूलामध्ये आहे. डोकलाममधून या पूलाचा भाग मागवण्यात आल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारी मध्यरात्री 10 लाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण 0 फूट गर्डर या पुलावर बसवण्यात आला. तर शनिवारी 40 फूट गर्डर अवघ्या काही मिनिटात लष्करमार्फत बसवण्यात आलाय. तर मध्यरात्री उरलेला 100 फूट गर्डर बसवण्यात आलाय.
या पुलाच्या कामाच्या निमित्ताने भारतीय लष्कराचं सामर्थ्य आणि ताकद सा-या देशाने पुन्हा एकदा पाहिलीय. कारण विक्रमी वेळेत या पूलाचं काम पूर्ण होत आहे.