close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबईतील दहा धोकादायक पुलांवर हातोडा पडणार

शहरातील १० अतिधोकादायक पुलांवर लवकरच हातोडा पडणार आहे. महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात येणारे हे पूल जमीनदोस्त करून तिथं नवे पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Sep 11, 2018, 09:45 PM IST
मुंबईतील दहा धोकादायक पुलांवर हातोडा पडणार
संग्रहित छाया

मुंबई : शहरातील १० अतिधोकादायक पुलांवर लवकरच हातोडा पडणार आहे. महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात येणारे हे पूल जमीनदोस्त करून तिथं नवे पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

या पुलांच्या कामामुळे आगामी काळात शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केलंय. या १० पुलांखेरीज २ पादचारी पूलही पाडले जाणार आहेत. तसंच १७८ पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. ७७ पुलांची किरकोळ दुरूस्ती केली जाणार आहे.
 
अंधेरीच्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेनं २९६ पुलांच्या संरचनात्मक पाहणी केली होती. या अहवालाच्या आधारे १० पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.