मुंबईत एनजी रॉयल पार्क परिसरात मोठी आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या

Mumbai Fire​ News : कांजूरमार्ग येथील एनजी रॉयल पार्क परिसरात लेव्हल 2 ला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे 10 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. 

Updated: Feb 28, 2022, 03:11 PM IST
मुंबईत एनजी रॉयल पार्क परिसरात मोठी आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या title=
PIC courtesy / ANI

मुंबई : Mumbai Fire News : कांजूरमार्ग येथील एनजी रॉयल पार्क परिसरात लेव्हल 2 ला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे 10 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. यावरुन आगीची भिषणता दिसून येत आहे आहेत. आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. (A level 2 fire breaks out in NG Royal Park area in Kanjurmarg of Mumbai.)

 एनजी रॉयल पार्कमधील एका इमारतीच्या 11 व्या मजल्यावर ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आधी घटनास्थळी दाखल झाल्या. आग मोठी असलण्याने आणखी गाड्या मागविण्यात आल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.