मुंबईत धावणार एसी लोकल, पश्चिम रेल्वेवर पहिली लोकल

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना एसी लोकलचे ख्रिसमस गिफ्ट मिळालेय. उद्यापासून गारेगार एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दुपारी२.१० वाजता अंधेरीहून चर्चगेटला पहिली फेरी सुटणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2017, 10:51 AM IST
मुंबईत धावणार एसी लोकल, पश्चिम रेल्वेवर पहिली लोकल title=
संग्रहित छाया

मुंबई : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना एसी लोकलचे ख्रिसमस गिफ्ट मिळालेय. उद्यापासून गारेगार एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दुपारी२.१० वाजता अंधेरीहून चर्चगेटला पहिली फेरी सुटणार आहे. 

२५ डिसेंबरपासून पश्चिम रेल्वेवर

मुंबईकर प्रवासी गेल्या वर्ष भरापासून आतुरतेने वाट पाहत असलेली एसी लोकल २५ डिसेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. या वातानुकूलित लोकलचे  तिकीट दर रेल्वे बोर्डाने निश्चित केलेत. मात्र हे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत असं सध्या दिसतंय.

अंधेरी ते चर्चगेट पहिली फेरी

वातानुकूलित लोकलच्या प्रवासासाठी प्रवाशांना सध्याच्या प्रथम श्रेणीच्या भाडयापेक्षा १.३ पटीने अधिक दर मोजावे लागणार आहे. अंधेरी ते चर्चगेट मार्गावर या लोकलची पहिली फेरी धावणार आहे. अंधेरी स्थानकातून सोमवारी दुपारी १४.१० मिनिटांनी वातानुकूलित लोकलची पहिली फेरी चर्चगेटच्या दिशेने रवाना होईल आणि चर्चगेटला दुपारी १४.४४ मिनिटांनी पोहोचेल.

लोकलच्या दररोज १२ फेऱ्या 

वातानुकूलित लोकलचे पासधारक हे प्रथम श्रेणीच्या डब्यातूनही प्रवास करू शकतील या लोकलच्या १२ फेऱ्या दररोज चालवण्यात येणार आहेत.एसी ट्रेनचं अंदाजे भाडं किती असणार याची उत्सुकता होती. प्रीमियम दर्जाचा स्तर लाभलेल्या एसी लोकलचे प्रवासभाडे कमीत कमी ६० रुपये ते जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत असेल. साधारण पुढील प्रमाणे तिकिट दर असण्याची  शक्यता आहे.

या स्थानकात थांबे

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान ही लोकल चालवण्यात येणार असून 10 थांबे अणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली,भाईंदर, वसई रोड , विरार या स्थानकांत वातानुकुलित लोकल थांबे घेईल. चर्चगेट -बोरिवली दरम्यान मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे व अंधेरी स्थानकात थांबे असतील.

असे असेल भाडे

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रु.,चर्चगेट ते दादर ९० रु.,चर्चगेट ते वांद्रे ९० रु.,चर्चगेट ते अंधेरी १३५ रु., चर्चगेट ते बोरिवली १८५ रु.,चर्चगेट ते भाईंदर २०५ रु.,चर्चगेट ते वसई २१० रु.,चर्चगेट ते विरार २२० रु.

लोकलचे वेळापत्रक