शपथविधीनंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ

नेटीझन्सची सोशल मीडियावर प्रतिक्रिया 

Updated: Nov 23, 2019, 01:43 PM IST
शपथविधीनंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ  title=

मुंबई : शनिवार सुट्टीचा वार समजून सुस्तावलेल्या सगळ्यांचीच झोप उडवणारी गोष्ट आज सकाळी घडली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची राजभवनात राज्यपालांच्या उपस्थिती शपथ घेतली. यानंतर सोशल मीडियावर एकच धुमाकूळ पाहायला मिळाला. 

24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकासआघाडी अंतर्गत सत्ता स्थापनेकरता प्रयत्न सुरू असतानाच 23 नोव्हेंबरचा दिवस उजाडला तो 'राजकीय भूकंप'सहीतच. अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन शपथविधी केल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ता नाराज झाले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या जनतेदेखील हा सर्वात मोठा धक्का होता. यानंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ घालत आहे. या memes वर एक नजर टाकूया.... 

# पवार आणि कल्याण स्टेशन कुठल्या बाजूला जाईल हे काही सांगता येत नाही..... 

# मंडप सजला.....नगारे वाजले....

हळद लावून नवरा तयार......

अन् नवरी दुस-याबरोबर फरार.....

# राज्यस्तरीय  राजकीय एकांकिका स्पर्धा 
प्रथम क्रमांक - देवेंद्र फडणवीस 
द्वितीय क्रमांक - पवार  बंधू
उत्तेजनार्थ -  श्री संजय राऊत

# परवा जी त्यांनी मोदींसोबत 45 मिनिटं शेतीवर जी चर्चा केली त्याच पीक आज आलं आहे..