धक्कादायक! मुंबईच्या वर एकमेकांना ठोकता ठोकता वाचली २ विमानं

मुंबईच्या वर उडणाऱ्या दोन विमानांची टक्कर होता होता वाचली आहे. ही घटना ७ फेब्रवारीची आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 11, 2018, 01:41 PM IST
धक्कादायक! मुंबईच्या वर एकमेकांना ठोकता ठोकता वाचली २ विमानं title=

मुंबई : मुंबईच्या वर उडणाऱ्या दोन विमानांची टक्कर होता होता वाचली आहे. ही घटना ७ फेब्रवारीची आहे.

थोडक्यात वाचली विमान

विस्तारा एअरलाईंसचं एक विमान इतक्या खाली आलं की, एयर इंडियाचं दुसरं विमान त्याच्या समोर होतं. दोन्ही विमानं एकमेकांच्या दिशेने जवळ येत होते. पण काही सेकंदाच्या अंतरावर हे दोन्ही विमान ठोकर होता होता वाचले.

मोठी दुर्घटना टळली

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार विस्ताराच्या काही सूत्रांनी माहिती दिली की, एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने पायलट्सला 27,000 फूटच्या उंचीवर उडण्याच सांगितले. त्यांनी चुकून ही गोष्ट केली. त्यावेळी बुधवारी रात्री आठ वाजले होते. त्याच वेळेस एयर इंडिया एअरबस A-319 मुंबई ते भोपाळ फ्लाईट नंबर AI-631 हे देखील 27,000 फूट उंचीवर उडत होतं.

अनेक प्रवाशांचा जीव वाचला

दुसरीकडे विस्ताराची फ्लाईट UK-997 दिल्लीहून पुण्याकडे येत होती. ज्यामध्ये 152 प्रवाशी होते. विस्ताराच्या फ्लाईटला 29,000 फुटावर उडण्यास सांगितले होते. पण ते 27,100 फूटापर्यंतच गेले. दोन्ही फ्लाइट्समध्ये फक्त 100 फुटांचं अंतर राहिलं. यातच दोन्ही विमानांच्या कॉकपिटमध्ये धोक्याचा  अलार्म वाजला. दोन्ही विमानांच्या पायलेट्सने यानंतर विमानांना कंट्रोल करत एकमेकांपासून लांब नेलं.

कशी घडली घटना

विस्ताराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, 'आमच्यासाठी प्रवासी आणि स्टाफची सुरक्षा सर्वात प्रथम आहे. आम्ही सर्व नियम आणि रेग्युलेशन्सच्या हिशोबानेच चालतो. ही घटना कशी घडली याची चौकशी होत आहे.'

'एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने म्हटलं की, ' खूप कमी वेळात ही दुर्घटना घडली असती. पण क्रूने आपलं काम निभावलं. विस्तारा एअरलाइंस आणि एटीसी यांच्यातील काही कन्फ्यूजनमुळे हे गोष्ट घडली.'