स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला गोंजारण्याचा भाजपचा प्रयत्न

शिवसेनेला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचं सूतोवाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलंय. 'झी २४ तास'च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी हे संकेत दिलेत.

Updated: Apr 6, 2018, 09:28 PM IST
स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला गोंजारण्याचा भाजपचा प्रयत्न title=

मुंबई : शिवसेनेला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचं सूतोवाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलंय. 'झी २४ तास'च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी हे संकेत दिलेत.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही महामेळाव्या बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली... आणि चंद्रकांत पाटलांनीही शिवसेना बिथरणार नाही, अशा शब्दांत विरोधकांना इशारा दिला. महामेळाव्यात भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं. त्यामुळं भाजपचा हा शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करतंय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

भाजपचा ३८ वा स्थापना दिन

भाजपच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्तानं मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. 'भाजपाच्या स्थापना दिवसावर पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांना आणि शुभचिंतकांचे मी आभार मानतो' असं अमित शहा यांनी म्हटलंय. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सर्वात जास्त कार्यकर्त्यांचं बलिदान भारतीय जनता पक्षानं दिलंय. मी त्या सर्व बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. भाजप आरक्षण कधीही रद्द करणार नाही, असंही आश्वासन यावेळी अमित शहा यांनी दिलंय.