डाटा ऑपरेटर,टायपिस्ट बनले कुलसचिव,उपकुलसचिव; मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार

फक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची थेट कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अनुभव कुलसचिव पदासाठी समकक्ष नसल्याचा शेराही नियुक्ती अहवालात देण्यात आला होता.

Updated: Nov 21, 2022, 07:25 PM IST
डाटा ऑपरेटर,टायपिस्ट बनले कुलसचिव,उपकुलसचिव; मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार title=

गोविंद तुपे, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठातून(University of Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका डेटा एन्ट्री ऑपरेटची( Data Operator ) चक्क जळगाव विद्यापीठाच्या कुलसचिव( Chancellor) पदावर नियुक्ती करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठातच्या भरती प्रक्रियेतला अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे.
 

फक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची थेट कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अनुभव कुलसचिव पदासाठी समकक्ष नसल्याचा शेराही नियुक्ती अहवालात देण्यात आला होता. तरीही सदर व्यक्ती जळगाव विद्यापीठात कुलसचिव पदापर्यंत जाऊन पोहोचली. हा सर्व बोगसगिरीचा प्रकार मुंबई विद्यापीठात सुरू होता.  कारण, मुंबई विद्यापीठात नियमबाह्य प्रमोशन देण्याचा प्रकार सुरू होता. या आधारावरच बाहेर प्रतिनियुक्त्या घेतल्या जात असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.

मुंबई विद्यापीठात अनेक जणांची अशीच नियमबाह्य उपकुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून या गैरप्रकाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर प्रक्रियेनुसारच भरती झाल्याचा दावा करत कुलसचिव विनोद पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

विनोद पाटील. हे सध्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलसचिव आहेत. पण, त्यांचा कामाचा अनुभव बघितलं तर त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून 4 वर्षे 7 महिने आणि प्रोग्रॅमर म्हणून 11 वर्षे 6 महिने काम केलं आहे. पण ते सध्या कुलसचिव म्हणून काम करताहेत.

बोगस डिग्री प्रकरण, पेपर फुटी यामुळं चर्चेत आसलेल्या या विद्यापिठात अकार्यक्षम आणि नियमबाह्य नियुक्त झाल्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल आहें. त्यामुळे यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.