मित्रांनी 'या' विद्यार्थ्याला पास होण्यासाठी दिलं 'हटके चॅलेंज'

व्हायरल होतोय फोटो

मित्रांनी 'या' विद्यार्थ्याला पास होण्यासाठी दिलं 'हटके चॅलेंज'

मुंबई : 2018 मधील दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. काही विद्यार्थ्यांना या निकालात भरघोस यश मिळालं तर काहींना या निकालात अपयश मिळालं आहे. असं असलं तरीही काही निकाल हे वेगळ्या कारणांमुळे चर्चेत येता. एका मुलाला सगळ्या विषयात 35 गुण मिळून त्याने 35 टक्के मिळवल्याची गोष्ट घडली होती. आता आणखी एका विद्यार्थ्याची चर्चा होतेय त्याला कारण देखील तसंच काहीस आहे. बारावीतील या विद्यार्थाच्या निकालाचा फोटो व्हायरल झाला आहे. बारावीचा हा विद्यार्थी नापास होईल अशी त्याच्या परिसरातील मुलांना विश्वास होता. म्हणून प्रत्येकाने त्याला चॅलेंज दिलं... हे हटके चॅलेंज बघून तुम्हाला देखील धक्का बसेल... 

हटके चॅलेंज 

ओमकार पंडीत असं या बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं नावं आहे. हा विद्यार्थी पास होणारच नाही असा विश्वास त्याच्या परिसरातील सगळ्यांना होता. म्हणून त्याच्यावर पैज लावण्यात आली. तो पास झाला तर सगळ्यांना 25 किलो चिकन देईन, सर्वांना Magnum आईस्क्रिम देईन  यासारख्या अनेक पैजा लावल्या. आणि त्या पैजा पूर्ण  झाल्या. .या ओमकारची सध्या जोरदार चर्चा आहे. ओमकारचा निकाल आणि हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हा विद्यार्थी पास होणारच नाही असा सगळ्यांचा विश्वास होता. म्हणून त्याला चॅलेंज दिलं. या विद्यार्थ्याने बारावीच्या परिक्षेत पास होऊन 41.46% मिळवले. मग बोर्ड लिहून त्याने त्याच्या मित्रांना चॅलेंजची आठवण करून दिली आणि आता मी करून दाखवलं आता तुम्ही करून दाखवा असं चॅलेंज दिलं. आणि महत्वाची बाब म्हणजे चॅलेंज दिलेल्या मित्रांनी ही गोष्ट मान्य करत आपल्या सगळ्या अटी पूर्ण केल्या.