close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#मोदी_परत_जा : प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मोदींना अनपेक्षित झटका

वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सोशल मीडियावरून नागरिक सत्ताधाऱ्यांबद्दल आपला राग व्यक्त करत आहेत

#मोदी_परत_जा : प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मोदींना अनपेक्षित झटका

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेत्यांची एक मोठी फळीच 'प्रचाराच्या सुपरसंडे'त उतरलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील आज महाराष्ट्रात प्रचार करताना दिसत आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथं झालेल्या दुसऱ्या सभेत पंतप्रधान मोदींनी विकासाचा अजेंडा घेऊनच भाषण केलं. अनुच्छेद ३७०, तीन तलाक यापैंकी कोणत्याही मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला नाही. उलट महाराष्ट्रातील सिंचन, पर्यटनाला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. आपल्या भाषणाची सुरूवात झाडीपट्टी या स्थानिक भाषेतून करत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. तरीदेखील मोदींचे आणि भाजपा सरकारचे काही मुद्दे मात्र महाराष्ट्रातील जनतेला पटलेले दिसत नाहीत. 

वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर नागरिक सत्ताधाऱ्यांबद्दल आपला राग व्यक्त करत आहेत. त्यामुळेच ट्विटरवर #मोदी_परत_जा असा मराठी हॅशटॅग ट्रेन्डिंगवर दिसतोय. 

महाराष्ट्राच्या खर्चानं गुजरातच्या आर्थिक केंद्राचे महत्त्व वाढवणारी बुलेट ट्रेन काशाला? घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीचं काय? नोकऱ्यांचं काय? महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचं काय? मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी 'आरे'सारख्या पर्यावरणाच्या हानीचं काय? केवळ पंतप्रधानांना पत्रं लिहिलं म्हणून सहा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली... आम्हाला हुकूमशाह नकोय, असं म्हणत आणि वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय.