close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबईत कुर्ला येथे अंत्ययात्रेत जमावाचा पोलिसांवर हल्ला

एका दुर्दैवी बापाच्या अंत्ययात्रेत जमावाने पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी आणि पोलिसांवर हल्ला.

Updated: Oct 22, 2019, 06:10 PM IST
मुंबईत कुर्ला येथे अंत्ययात्रेत जमावाचा पोलिसांवर हल्ला

मुंबई : एका दुर्दैवी बापाच्या अंत्ययात्रेत जमावाने पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी आणि पोलिसांवर हल्ला केल्याची घटना कुर्ल्यात घडली आहे. पंचाराम रिठाडिया यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. मात्र तक्रार देवूनही मुलगी सापडली नाहीच. उलट पोलीसच मुलीच्या वडिलांना धमक्या देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकारानंतर नैराश्यातून पंचाराम रिठाडिया यांनी रेल्वेरुळांवर आपले आयुष्य संपवले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठा जमाव आज जमा झाला होता. यावेळी जमावाने पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबहाजी केली, तसचं पोलिसांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी कुर्ला परिसरात तणावाची स्थिती आहे.