Video: अनंतच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स. अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीतील डान्सचा व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या व्हिडीओची होतेय जोरदार चर्चा. 

Updated: Jul 13, 2024, 03:22 PM IST
Video: अनंतच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल  title=

Baba Ramdev Dance Video Viral:  12 जुलै रोजी अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले आहेत. योगगुरू बाबा रामदेव देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर अनंत-राधिकाच्या लग्नातील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका व्हिडीओमध्ये बाबा रामदेव त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीत अनंत अंबानी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

अनंतच्या लग्नात बाबा रामदेव यांचा डान्स

योगगुरु बाबा रामदेव हे त्यांच्या बिझनेस पार्टनर बाळकृष्ण यांच्यासोबत मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी दाखल झाले होते. सोशल मीडियावर अनंत अंबानींच्या लग्नातील मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनंत अंबानी आणि बाबा रामदेव हे एकमेकांचे हात धरून डान्स करताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अनंत-राधिका बालपणीचे मित्र

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे बालपणीचे मित्र असून ते 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे साईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. अनंत आणि राधिका एकाच शाळेत शिक्षणासाठी होते. अनंत-राधिका बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. 

अनंत-राधिकाच्या लग्नाचा खर्च 

मीडिया रिपोर्टनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान मुलाच्या लग्नावर 5000 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये त्यांनी देशी-विदेशी पाहुण्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रायवेट जेट बुक केली होती. त्यांच्यासाठी अनेक पंचतारांकित हॉटेल अंबानी यांनी बुक केली होती.