close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबईत जेवणाच्या बिलावरुन हॉटेल मालकाला बेदम मारहाण

 हॉटेलच्या मालकाला पाच ते सहा तरुणांनी बेदम मारहाण केली.

Updated: Sep 20, 2019, 02:57 PM IST
मुंबईत जेवणाच्या बिलावरुन हॉटेल मालकाला बेदम मारहाण

मुंबई : अंधेरीतील ग्रिटींग हॉटेलच्या मालकाला पाच ते सहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जेवणाच्या बिलावरून रागाच्या भरात बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत चित्रित झाल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत.

दोन महिन्यांपूर्वीही संतोष नावाची व्यक्ती या हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवली होती. पण त्यानंतर हॉटेलमालकाने बिल विचारल्यानंतर त्यांच्यात वाद झालेले होते. १९ सप्टेंबरला पुन्हा आरोपी आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याने हॉकी स्टिक ने मारहाण केली. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत आम्हाला कोण बिल विचारत नाही, अशी धमकी देऊन मारहाणीचा हा प्रकार झाल्याचे समोर आला आहे.