मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 वी जागा बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतू राज्यसभेची 6 वी जागा लढवण्यावर भाजप ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, 'राज्य सभेची निवडणूक 10 तारीखला होणार आहे. आजवर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. राज्यसभेत भाजपला 3 जागा मिळाव्यात. विधान परिषदेसाठी काही विचार करता येईल.'
'मविआने आम्हाला सांगितले विधान परिषद 5 जागा देऊ. खरं तर महाविकास आघाडीने पुन्हा पुन्हा तोच प्रस्ताव पाठवला आहे. विधानसभेत आमच्याकडे 113 चं संख्याबळ आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेची जागा लढवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. ती जागा उलट महाविकास आघाडीने 4 थी जागा लढवली नाही तर, आम्ही विधानपरिषदेच्या जागांबाबत विचार करू', असे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.