शरद पवार यांच्या निवृतीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती

Sharad Pawar Resigns: शरद पवार पुन्हा एकदा एक दोन दिवस विचार करुन आपला  अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 

वनिता कांबळे | Updated: May 3, 2023, 10:11 AM IST
शरद पवार यांच्या निवृतीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती title=

Sharad Pawar resigns as NCP chief : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची  घोषणा केली आहे. ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर  शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यानंतर आता शरद पवार यांच्या निवृतीच्या घोषणेबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा विचार करत शरद पवार यांनी निर्णयाबाबत विचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार, अशी मोठी घोषणा पवारांनी केली. संसदीय राजकारणातून पवार निवृत्त होतायत. यापुढे निवडणूक लढवणार नाही. राज्यसभेची आता तीन वर्षं राहिलीयत त्यानंतर आता नवी जबाबदारी घेणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं. पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. त्यावेळी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. 

शरद पवार यांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी  मोठा गोंधळ घातला. पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी वाय बी सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळ अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र कार्यकर्त्ये ऐकायला तयार नसल्यानं अखेर शरद पवारांना फोन लावून देण्यात आला. फोनवरून पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. मात्र तरीही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते.

अजित पवार शरद पवार यांचा निरोप घेऊन आले

शरद पवार यांचा निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहेत. तर, अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडू नये. राजीनामा सत्र थांबवावे अशा  सूचना शरद पवार यांनी दिल्या असल्याचे सागंत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच शरद पवार पुन्हा एकदा एक दोन दिवस विचार करुन आपला  अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.