मुंबई : भाजपने मुंबई महापालिकेच्या राजकारणात बरेच फेरबदल केलेत. महापालिकेत भाजपने आक्रमक आणि अभ्यासू चेहरा देण्यासाठी भालचंद्र शिरसाट यांना उतरवले आहेत. भालचंद्र शिरसाटांसाठी गणेश खणकर यांचा राजकीय बळी दिल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या आदेशानंतर गणेश खणकरांनी स्विकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.
#BreakingNews । भाजपकडून मुंबई महापालिकेच्या राजकारणात फेरबदल । महापालिकेत भाजपने आक्रमक आणि अभ्यासू चेहरा देण्यासाठी भालचंद्र शिरसाट यांना उतरवले । भालचंद्र शिरसाटांसाठी गणेश खणकर यांचा राजकीय बळी दिल्याची चर्चाhttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/VlK15tUpJD
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 29, 2020
त्यांच्या जागी आता भालचंद्र शिरसाट यांना स्विकृत नगरसेवक म्हणून घेतले जाणार आहे. भालचंद्र शिरसाट हे मागील दोन्ही महापालिका निवडणुकीत पराभूत झालेत मात्र तरिही महापालिका भाजप प्रभारी म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता स्विकृत नगरसेवक पद देवून पालिकेत पक्षाला आक्रमक चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.