भाजपचे मंत्री प्रकाश मेहता अडचणीत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आश्वासन

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Updated: Aug 1, 2017, 11:40 AM IST
भाजपचे मंत्री प्रकाश मेहता अडचणीत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आश्वासन title=

मुंबई : एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

बिल्डरला ५०० कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहतांनी शेरा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देत मेहतांनी शेरा दिल्याची कबुली दिली. 

त्या फाईलवर चुकून शेरा दिल्या असून दुसऱ्या दिवशी ती फाईल एसआरएला पाठवली नसल्याचा दावा मेहतांनी केला. मात्र या उत्तरावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगून याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत दिली. 

याप्रकरणी जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला अडणीत आणले आणि ही यांची पारर्दशकता असल्याचे म्हटले. प्रकाश मेहतांच्या घोळामुळे भर सभागृहात सरकाराची नाचक्की झालेय. एसआरए प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश दिले आहेत. मेहताच्या निष्काळजीपणामुळे बिल्डरला ५०० कोटींचा फायदा झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.