मुंबई : नाराज भाजप खासदार नाना पटोले आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यवतमाळ किटकनाशक मृत्यूप्रकरणी ही भेट असणार आहे.
यवतमाळ किटकनाशक मृत्यूंची तुलना त्यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेशी केलीय. त्याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी शेतकरी प्रश्नावरून केंद्रातील मोदी सरकारवर जाहीर टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली होती.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडेही भेटीची वेळ मागितलीय. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.