VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स

Bachchan Family : बच्चन कुटुंबाचं घर सोडून ऐश्वर्या राय आईकडे राहिला गेली अशी बातमी आल्यानंतर अभिषेक - अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. या कार्यक्रमात शाहरुखच्या गाण्यावर बॉलीवूड थिरकलं. पण ऐश्वर्या मात्र मात्र अमिताभ - अभिषेकसोबत नाही कोणासोबत डान्स केला तुम्हीच पाहा. 

नेहा चौधरी | Updated: Dec 16, 2023, 05:34 PM IST
VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स
Bollywood danced to Shahrukh song but Aishwarya did not dance with Amitabh Abhishek annual function of kids school video

Bachchan Family : अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. त्यात अभिषेक आणि ऐश्वर्या लेक आराध्यासाठी आतापर्यंत एकत्र होते. तर आता ऐश्वर्या बच्चन कुटुंबाचं घर सोडून आईकडे राहिला गेली अशी बातमी समोर आली. तरदुसरीकडे बच्चन कुटुंबाची लाडली आराध्याच्या धिरुभाई अंबानी स्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रमात अभिषेक, अमिताभ, ऐश्वर्या राय आणि अगस्त्या नंदा दिसून आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्या ज्यात ऐश्वर्या आपल्या आईसोबत एका गाडीतून उतरली. तर त्याच वेळी दुसऱ्या गाडीतून अभिषेक आणि अमिताभ बच्चन उतरले. त्यावेळी ऐश्वर्या राय अभिषेकला काही तरी म्हणाली. (Bollywood danced to Shahrukh song but Aishwarya did not dance with Amitabh Abhishek annual function of kids school video)

Add Zee News as a Preferred Source

तर दुसरीकडे अमिताभ बच्चन सून ऐश्वर्या रायच्या आईशी बोलताना दिसले. यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या रायमध्ये सगळं ठिक आहे की नाही यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. धिरुभाई अंबानी स्कूलमधील वार्षिक कार्यक्रमासाठी बॉलिवूडने हजेरी लावली होती. शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, करीना कपूर, करण जोहर, शाहिद कपूर, मीरा राजपूत, रोहित शेट्टीसह अनेक कलाकार मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. शाहरुख गौरीचा मुलगा अबराम, ऐश्वर्या अभिषेकची मुलगी आराध्या यांनी एक नाटक सादर केलं. तर करिना सैफच्या मुलगा तैमूरने एका गाण्यावर डान्स केला. 

धिरुभाई अंबानी स्कूलमधील वार्षिक कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात आहेत. या कार्यक्रमातील अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख खानच्या गाण्यावर अख्खा बॉलिवूड थरकताना दिसत आहे. मुलांच्या सर्व परफॉर्मन्सनंतर पालकांनी डान्स करुन या सोहळ्याचा आनंद घेतला. शाहरुख खानचा ओम शांती ओम या चित्रपटातील दिवानगी दिवानगी या गाण्यावर सगळ्या कलाकारांनी डान्स केला. 

या व्हिडीओमध्ये अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या, शाहरुख, सुहाना आणि करण जोहर डान्स करताना दिसत आहेत. पण तुम्ही पाहू शकता अमिताभ अभिषेक एका बाजूला तर ऐश्वर्या राय शाहरुख आणि करण जोहर सोबत नाचताना दिसत आहे. त्यामुळे या अभिषेक ऐश्वर्यामधील नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

या कार्यक्रमातील आराध्या, अबराम यांच्या परफॉर्मन्सने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे. या नाटकादरम्यान 10 वर्षांच्या अबरामनेही बाबा शाहरुखची आयकॉनिक पोझही केली. ते पाहून प्रेक्षकांसोबत शाहरुख, गौरी आणि सुहाना यांचा आनंद गगणात मावत नव्हता. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More