Bulli Bai App Case: गेले काही दिवस सोशल मीडियावर गाजत असलेल्या 'बुली बाई' (Bulli Bai) प्रकरणात मुंबईत पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
बुली बाई (Bulli Bai) नावाने गिटहब (GitHub)नावाच्या ऑनलाईन अॅपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
बंगळुरूमधून तरुणाला अटक
याचे तीव्र पडसाद उमटले. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी बंगळुरुमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली. या तरुणाचं नाव विशाल कुमार असून तो इंजिनिअरिंगाच विद्यार्थी आहे. आज त्याला कोर्टा हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मास्टरमाईंड महिलेलाही अटक
विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख आरोपी ही एक महिलाच असून तिला उत्तराखंडमधून अटक करण्यात आल्याची महिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दोनही आरोप एकमेकांना ओळखत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला बुली बाई अॅपशी संबंधित तीन अकाऊंटस हाताळत होती.
सोशल मीडियावर तयार केलं अॅप
विशाल कुमार आणि या महिलेने एकत्र येत हे अॅप तयार केलं होतं, यासाठी विशाल कुमारने खालसा सुप्रीमीस्ट (Khalsa Supremacist) नावाने अकाऊंट तयार केलं होतं. यानंतर ३१ डिसेंबरला इतर अकाऊंटची नावंही शीख समुदायाशी मिळती-जुळती ठेवली. जेणेकरुन लोकांना ही अकाऊंट शीख समाजातील लोकांनी बनवल्याचं वाटलं पाहिजे.
काय आहे नेमकं प्रकरण
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुली बाई' अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे (Muslim womens) फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही (auction) लावली जात होती