खड्डे बुजलेच नाहीत तर मग एवढा खर्च कशासाठी केलात? कॅगचा मुंबई पालिकेला सवाल

खड्डे बुजवण्यासाठी वापरलं जाणारं हॉट मिक्स तयार करण्याच्या खर्चाबाबत कॅगने शंका उपस्थित केली आहे. 

Updated: Jul 24, 2018, 11:40 PM IST
खड्डे बुजलेच नाहीत तर मग एवढा खर्च कशासाठी केलात? कॅगचा मुंबई पालिकेला सवाल title=

मुंबई: महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामांवरुन महालेखाधिवक्त्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. नागपूरमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात कॅगचा अहवाल सादर झाला. यामध्ये मुंबई महापालिकेच्या कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 

खड्डे बुजवण्यासाठी वापरलं जाणारं हॉट मिक्स तयार करण्याच्या खर्चाबाबत कॅगने शंका उपस्थित केली आहे. हॉटमिक्स वापरूनही खड्डे भरले जात नसल्याने यावर्षीपासून महापालिकेनं हॉटमिक्सऐवजी कोल्डमिक्स तयार करून वापरण्यास सुरुवात केली आहे. 

७ वर्षांत ६६ कोटी रुपये खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजले नाहीत. तर मग त्यावर एवढा खर्च का केला, अशा प्रश्न आता काँग्रेसने उपस्थित केला आहे. 

कॅगने उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.