मध्य रेल्वेची कल्याण-कसारा वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे विस्कळीत

Updated: Jun 5, 2018, 01:44 PM IST
मध्य रेल्वेची कल्याण-कसारा वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डाऊन आणि अप दोन्ही मार्गावरील ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने कल्याण-कसारा ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहाड स्थानकाजवळ हे झाड ओव्हरहेड वायरवर पडलं आहे. ते हटवण्याचं काम सुरु आहे. अनेक प्रवासी रुळावर उतरून पायी प्रवास करत आहेत.